Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


एकट्याने केले तर -

काही साध्य होत नाही !

एकत्रित केल्यानेच -

खूप काही होत राही !


आजची रात्रच काय -

दिवसपण वै-याची !

यापुढे जगणेपण -

वाटते खूप धोक्याची !


स्वतःला आवडलं की -

हवं ते करता येतं !

तसं जर कां झालं की -

मनासारखं घडतं !


श्वासपण उपरंच -

जगणंही उपरंच !

जगून काय करावं - 

जगपण उपरंच !


तोडलं , मोडलं तरी- 

निसर्ग पुन्हा फुलतं !

तसं आपलं जीवन -

फुलून यावं म्हणतं !

@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर 

( सूर्यकांत ना .कामून ) 

मो .नं. 07620540722

Post a Comment

0 Comments