चारोळ्या
कुठे अबलांची होळी -
कुठे अर्भकांची होळी !
होळी म्हणू मी कसली ?
माणूसजातच मेली !
जिकडे पाहू तिकडे -
आत्ता रावणाचे राज्य !
रामाला आणूनपण -
नाही कुठे रामराज्य !
प्रेमाची ना फुलवात -
संध्येची ना सांजवात !
तेलाविनाच जळते -
ज्योतीतली जोडवात !
रामाच्या राज्यात तेंव्हा -
रावणाचा झाला अंत !
आज मोदीच्या राज्यात -
रावण पुन्हा जिवंत !
आज देशात सर्वत्र -
पेटती आगच आग !
जात-धर्माच्या नावाने -
पेटवू पाहती बाग !
राग-द्वेष संपवून -
प्रेमाने पेटवा होळी !
बंधूभाव जपवीत -
नेमेचि आणा दिवाळी !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो.नं. 07620540722

Post a Comment
0 Comments