Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


रुपया थकून गेला -

पण ना बहुरुपिया !

अच्छे दिवस सांगून -

आला आम्हां फसवाया !


बिनकामाची माणसे -

कुठल्याच ना कामाची !

असेल कुठे खायला -

तिथे आधी पोचायची !


कधी कुठलीही वेळ -

एकसारखी नसते !

वेळ - प्रसंग पाहून -

वेळ चालत असते !


कुलाचार,कुलधर्म -

आज कुणी कां पाळतो ?

होळी असो वा दिवाळी -

नीच वृत्ती दाखवतो !


पायाखालची जमीन -

आज पायीही राहिना !

डोईवरची सावली -

डोईवरही राहिना !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं. 07620540722

Post a Comment

0 Comments