@ चारोळ्या @
पैसे कमावण्यापेक्षा -
माणसे आधी कमवा !
माणसाला माणसाची -
सवय लावून ठेवा !
चूक मान्य करायला -
खूप धाडस लागते !
अशी धाडस असते -
समजूत माणसात !
कुणा शापाने कुणाचा -
अंत होतच नसतो !
ज्याच्या त्याच्या कर्मानेच -
ज्याचा त्याचा अंत होतो !
पूर्वीच्या प्रेमात होती -
फुलांची सुंदर बाग !
आजच्या प्रेमात सदा -णणच
फक्त विद्रोहाची आग !
देश सुरक्षित नाही -
सांगते देशाची स्थिती !
सध्याची तर देशाची -
भयावह परिस्थिती !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो.नं .7620540722

Post a Comment
0 Comments