चारोळ्या
आयुष्य सुंदर आहे
हसत खेळत जगा !
जगणे आपल्या हाती -
जगता कळेल बघा !
नीट जगूनपण -
नीट जगता येईना !
नीट जगू पाहताना -
नीटसं काही होईना !
सगळं दिसूनपण -
सांगावंसं कां वाटतं ?
वेड्याचं सोंग घेऊन -
वेड्यागत कां वागतं ?
जगात असलो काय -
जगात नसलो काय ?
असलो-नसलो तरी -
फरक पडतो काय ?
सांगताही येत नाही
सहनही होत नाही !
असं साहू तरी किती -
सहणे थांबत नाही !
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना. कामून )
मो.नं. 07620540722
Post a Comment
0 Comments