Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


जीवनात कुणीपण -

कधीच व्यस्त नसतो !

व्यस्त असून एखादा -

वेळ काढूनही येतो !


वेळात वेळ काढून -

आपण जगाया हवं !

वेळेला वेळ देताना -

वेळेलाही कळू यावं !


प्रत्येकक्षण आपलं -

खूप मोलाचं असतं !

उद्याची व्यर्थ अपेक्षा -

जगा जगणे आत्ताचे !


कुणाच्या काळजीपोटी -

कुणी जगत नसतो !

आपल्या काळजीपोटी -

प्रत्येकजण जगतो !


अंधभक्त नेहमीच -

अंधच कां राहणार ?

डोळे उघडून कधी -

नाहीच कां पाहणार ?


राणे काय बोलतोय -

त्याला तरी कळते कां ?

राज्यात विष पेरणे -

हेच त्याचे उद्योग कां ?

@ कवी - सूर्यांबिका , सोलापूर

( सूर्यकांत ना . कामून )

मो.नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments