चारोळ्या
प्रत्येक वळणावर -
वाटे भारावलेपण !
पण कां वाटेना मज -
आपले आपलेपण ?
सोबती असो आपल्या -
नित्य चांगली माणसं !
वाईटकाळ जाताच -
सुखाचा मग प्रवास !
प्रवास आयुष्यातला -
सोपा कधीच नसतो !
आपण जसं जगतो
तसा सोपा होत जातो !
मनें जुळली की मग -
सा-या गोष्टी जुळतात !
जे काही अशक्य आहे -
तेही जुळू पाहतात !
मी तर एक माणूस
माणूस माझी ओळख !
पण माणूस म्हणून -
कां पाहिना कुणी एक ?
खूप सांगतो आपण -
आपल्यात खूप काही !
पण प्रत्यक्षात मात्र -
आपल्यात नसे काही !
उधारकी जिंदगी मी -
कां बरे जगतो आहे ?
कधी उदार होऊन -
कां न मी जगतो आहे ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो.ना. 07620540722
Post a Comment
0 Comments