@ चारोळ्या @
हरलं तर हरू द्या -
उद्या नक्की जिंकणार !
आजची हार उद्याला -
आपणां जिंकू देणार !
मिळत नाही कुठली -
कधी सहजासहजी !
प्रयत्न कराल तर -
पालटेल मग बाजी !
आधी कष्ट मग फळ -
जगणे नको सुखाचे !
जितके कराल कष्ट -
तितके जीणे सौख्याचे !
आयुष्यात क्षण क्षण -
कां करावे व्यवहार ?
कधी व्यवहारातही -
जपा संस्कृती- संस्कार !
हक्काचं सोडलं तर -
कचराच करतात !
धरून चालाल तर-
सोन्यागत जपतात !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो.नं.07620540722
Post a Comment
0 Comments