Type Here to Get Search Results !

जांभोरीत वरसुबाई देवीचा भव्य यात्रोत्सव!

 


प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर

जांभोरी दि.१६ एप्रिल पुणे जिल्हयाच्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील जांभोरी वरसुबाई देवीची महायात्रा मोठ्या ऊत्साहात पार पडली ,मंचर पासुन पन्नास किलोमीटरवर असुनही खडकी पिंपळगाव, लाखणगाव तसेच खेड तालुका व आदिवासी पट्टयातील गावागावातुन आपल्या बैलगाडयांसह बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन आणि पहाडी आवाजाचे अनाउंसर नवनाथ वाळुंज, रवी शिंदे, निवृत्ती भांड यांनी सर्व बैलगाडारसिकांना धावते समालोचन करत शर्यतीचा थरार निर्माण केला.



यात्रेस शिवसेना महिला आघाडी व स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट, जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निघोट, प्रसिद्ध बैलगाडा मालक रामदास पोंदे,मारुती बबन केंगले,गणेश मोहरे, खडकीचे सरपंच दत्तात्रय बांगर, बिरसा ब्रिगेड चे माजी तालुकाध्यक्ष आदिनाथ हिले ,बाळासाहेब पानमंद, हनुमंत लबडे निरगुडसर,बाळासाहेब शेलार चांडोह उपस्थित होते.



पोंदे शेलार जुगलबंदी अकरा पाईंट पंचावन्न सेकंद, सरपंच दत्तात्रय बांगर अकरा पाईंट एकोणपन्नास सेकंद तर फायनल ला अकरा पाईंट चौतिस सेकंद व गणेश मोहरे यांचा जादु बैल आणि शहाण्णव ग्रुप चा सुंदर हे आजच्या शर्यतीचे आकर्षण ठरले.



यात्रा कमेटीचे त्ता गिरंगे,सरपंच सुनंदा पारधी,उपसरपंच बबन केंगले, मनोहर केंगले,शामराव बांबळे, राजु भोकटे,महादु केंगले,चिंधु केंगले, पांडुरंग केंगले,मंगेश केंगले यांनी यात्रेची ऊत्तम व्यवस्था पाहिली.



Post a Comment

0 Comments