Type Here to Get Search Results !

विकास काळे व अंकिता विकास काळे याना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित



घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे

घोडेगाव येथील राहवाशी असलेले विकास काळे आणि अंकिता काळे या दाम्पत्यांना महाराष्ट्र राज्याचा मानाचा शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला असून कब्बड्डी या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रात नवरा बायकोला एकच पुरस्कार मिळाल्याची ही पहिलीच घटना आहे.



अंकिता विकास काळे माजी कॅप्टन महाराष्ट्र कबड्डी संघ यांना १८/४/२०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सि. पी. राधाकृष्णन, अजित पवार उपमुख्यमंत्री महा. राज्य, दत्तात्रय भरणे क्रीडा मंत्री महा. राज्य. यांच्या हस्ते बालेवाडी स्टेडियम ठिकाणी महाराष्ट्रक्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर त्यांचे पती विकास बबन काळे माजी कॅप्टन महाराष्ट्र कबड्डी संघ तसेच राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते, व प्रो कबड्डी मध्ये त्यांनी ६ संघांचे प्रतिनिधित्व केले असून त्यांना सन २०१७/१८ या सालचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले घोडेगाव सारख्या ग्रामीण ठिकाणी राहून कब्बडी चे प्रशिक्षण घेऊन एवढ्या मोठ्या यशाला गवसणी घालण्याचे काम या दाम्पत्याने केले असून यामध्ये विशेष बाब म्हणजे विकास बबन काळे व अंकिता विकास काळे, हे कबड्डी खेळाच्या इतिहासातील आत्ता पर्यंतचे महाराष्ट्र मधील प्रथम नवरा बायको आहेत.



Post a Comment

0 Comments