Type Here to Get Search Results !

समर्थ संकुलातील ४१ विद्यार्थ्यांची ह्युंदाई मोटर्स मध्ये निवड



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आय टी आय,बेल्हे येथे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने आयटीआय व पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी ह्युंदाई मोटर्स लिमिटेड, पुणे यांच्या वतीने प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये आयटीआयच्या ३१ व पॉलिटेक्निकच्या १० विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले व आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी दिली.

या कॅम्पस ड्राइव्हमध्ये ५५ विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

समर्थ संकुलातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :

मेकॅनिक मोटर वेहिकल:-

आर्यन नवगुडे, सौरभ लामखडे,अक्षय डुंबरे.


 इलेक्ट्रिशियन व डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन :-

कृष्णा करांडे,प्रसाद औटी,अभिजीत पिंगळे, मच्छिंद्र घोलप,प्रतीक भोर, कुणाल हाडवळे,अरमान जमादार, आदित्य वाळुंज,दमयंती आस्वार.


डिझेल मेकॅनिक:-

साहिल हिले,सुयश बोऱ्हाडे,सतीश रौनक.


मेकॅनिक रेफ्रिजरेशन व एसी :-

विवेक आंधळे,विनायक बिचारे,गौरव वाढवणे,अविनाश पानसरे,शाहिद पटेल,शुभम थोरात,स्वप्निल रणपिसे, सिद्धेश भनगडे.


ड्राफ्ट्समन मेकॅनिकल :-

निकिता काटे,वेदांत हाडवळे,युवराज ढोकळे,सागर माधव,पायल रोहकले,प्राची शिंदे,प्रगती दुर्गुडे,गौरी खनकर.


समर्थ पॉलिटेक्निक:-

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग:-

प्रेम ढेरंगे,चारू मुळे,महेक पटेल, संग्राम मुळे,वैभवी गोडसे,नंदिनी लोणकर,सृष्टी महाले,सिद्धी शिंदे, अर्पिता हिंगडे,श्वेता आरोटे.


सदर निवड प्रक्रिया हुंदाई मोटर्सचे एच आर प्रतिनिधी राहुल पाटील,नेकझोरा कन्सल्टन्सी चे सी एम ओ करण राठोड व नेकझोरा कन्सल्टन्सी चे सीईओ अंकुश वानखेडे,नेकझोरा कन्सल्टन्सी चे फाउंडर राजेंद्र देसाई, को-फाउंडर लोकेश पाटील 

यांनी पूर्ण केली.

मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची निवड करताना संभाषण कौशल्य,तांत्रिक ज्ञान,सादरीकरण,सॉफ्ट स्किल, सामान्य ज्ञान या बाबींचा विचार करण्यात आल्याची माहिती राहुल पाटील एच आर प्रतिनिधी राहुल पाटील यांनी दिली.

सदर प्लेसमेंट साठी आयटीआयचे उपप्राचार्य विष्णू मापारी तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.संकेत विगे,विलास सोनवणे,विकास कणसे,महेंद्र न्हावी आदींनी परिश्रम घेतले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments