Type Here to Get Search Results !

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड स्पर्धेत यश



प्रतिनिधी : प्रा. प्रवीण ताजने सर

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ऑलिम्पियाड स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याची माहिती समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.

नॅशनल सायन्स ऑलिंपियाड,इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड,इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल मधील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या १२९ मुलांनी सहभाग घेतला होता.या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व स्टुडन्ट परफॉर्मन्स रिपोर्ट देऊन गौरवण्यात आले.त्यापैकी २१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक,प्रमाणपत्र व व स्टुडन्ट परफॉर्मन्स रिपोर्ट देऊन गौरविण्यात आले.

इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये अनन्या पोटे,तेजस्विनी आहेर,ईश्वरी भांबेरे,हर्षवर्धन आरोटे या सर्वांना सुवर्णपदक,प्रशस्तीपत्रक व स्टुडन्ट परफॉर्मन्स रिपोर्ट मिळाला. तसेच नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये पारस मोरे,सानवी गुंजाळ,कृष्णांग गुंजाळ,तेजस्विनी आहेर,श्रीनिका शेळके यांना सुवर्णपदक,प्रशस्तीपत्रक व स्टुडन्ट परफॉर्मन्स रिपोर्ट मिळाले.

इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये श्लोक दाते,सानवी गुंजाळ,अनन्या पोटे,कृष्णांग गुंजाळ,आयुषा डोंगरे,तेजस्विनी आहेर,सार्थक गोफणे,आर्या गोरडे,जुई कोरडे,रेवा हांडे,सिद्धेश पवार,संस्कृती आहेर यांना सुवर्णपदक,प्रशस्तीपत्र व व स्टुडन्ट परफॉर्मन्स रिपोर्ट मिळाले. यामधून कुमारी तेजस्विनी आहेर व सिद्धेश पवार हे दोघे इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड साठी दुसऱ्या लेवलसाठी प्रविष्ट झाले व त्यांना मेरिट सर्टिफिकेट मिळाले.  

या सर्व विद्यार्थ्यांना योजना औटी,वैशाली सरोदे,शितल पाडेकर,रूपाली भांबेरे,कविता जाधव,विशाखा शिंदे,प्रिया कडुसकर,अक्षता गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले.सायन्स ओलंपिक फाउंडेशन स्पर्धा परीक्षेचे समन्वयक म्हणून प्रिया कडूसकर यांनी मार्गदर्शन केले.

पारितोषिक वितरण माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई आहेर,क्रीडा संचालक एच पी नरसुडे व सखाराम मातेले यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,सारिकाताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी,सूत्रसंचालन प्रिया कडूसकर व शितल पाडेकर यांनी तर आभार रामचंद्र मते यांनी मानले.

Post a Comment

0 Comments