Type Here to Get Search Results !

प्रा. छाया बोरकर लिखित विचारमंथन क्र.३०९



विविधतेने नटलेल्या जगामध्ये विविध रंग,रूप, भाषा ह्या"व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती"असतात.त्या परवृत्ती नुसार आयुष्याच्या वाटेवर प्रांतवार बदलतांना प्रत्ययास येते. मग काही व्यक्ती स्वभावाने कोणी खूप छान, कोणी वाईट, कोणी कसा कोणी तसा तर काही मध्ये उर्मटपणा तर कोणी समजदार असे आप आपल्या प्रवृत्तीनुसार व्यक्ती असतात.मात्र व्यक्तीत उर्मटपणा असण्यापेक्षा समजूतदारपणा असणे अधिक गरजेचे आहे. समजूतदारपणा मुळे माणसात मधील माणूसपणा कायम राहून समाजात, घरात, एक आगळा वेगळा मान प्रतिष्ठा अस्तित्वात राहते. तर,घरात दारात कितीही वाद,झगडे,तंटे,भांडण झाले तरी.... ते चार चौघात न,येता ते घरातल्या घरात समजूतदारपणाने शांत चित्ताने.... मोठे मोठे वाद मिटवले जातात आणि माणसा माणसातील गैरसमज दूर करुन घरदार तुटण्यापासून वाचवले जाते.तर, उर्मटपणाने किंवा आगावू पणाने माणसाच्या कोणत्याही गोष्टीचा इतरांच्या आमोरा समोरचा विचारविनिमय न, करता काही व्यक्ती राईचां पहाड करून नातेसंबंध, शेजार धर्म,घरदार, तोडतात आणि मग नाही त्या गोष्टीला सामोर जातात.त्यामुळे माणसात काही नसलं तरी चालेल मात्र समजूतदारपणा असायला हवा जो करोडो च्या दागिन्या पेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो आणि चार चौघात उठून आपली एक ओळख निर्माण करून लख्ख प्रकाशाच्या झोतात येतो.आपल्या पासून आपली माणसं तुटत नाही तर, ते समजूतदार पणाने भांडण टळतात याचा अर्थ असा नाही की, ती माणसं घाबरतात असं... मुळीच नाही. तर, ते समजूतदारपणाने ते समजून घेत एक संधी देतात व विकोपाला गेलेले वाद हे समजूतदार पणाने संपवतात.कारण वादाने वाद वाढतात, गैरसमजदारीने राग वाढतो, रागाने भांडण, आणि भांडणे दुरावा येतो, आणि मग नात्याचा शेवट सुरू होतो. मग नात्याचा शेवट होण्यापूर्वीचं ते तुटते त्यामुळे माणसाल समजूतदार पणाने चुकांवर कानाडोळा न, करता ते निस्तराने गरजेचे असते.त्यामुळे माणसाच्या आयुष्यात दुरावा येतं नाही.माणसाच्या जीवनात समजूतदारपणा असा दागिना आहे जो, ज्याच्या जवळ असेल त्याच्याजवळ माणसाचा गोतावळा कायम असतो. मात्र जर का त्या समजूतदारपणावर कधी त्यागाचा रंग चढला की, अहंकाराचा रंग आपोआप अधिक चढतो असतो आणि माणसाच्या गोतावळा दूर होतो. मग रंगीबिरंगी जीवनात एकाकी पणाचां दुरावा जाणवतो.त्यामुळे माणसाने जीवनात प्रत्येक गोष्ट शांतचित्ताने, समजूतदारपणाने जगले आणि राहिले तर, वाईट वाटणारे दिवस चांगलें आणि समाधानकारक वाटतात. व इतरांच्या चुकावर मलमपट्टी करता येते.मात्र समजूतदारपणा नसला तर, मग प्रत्येक लहान सहान गोष्टीचा सुद्धा माणसात मनस्ताप वाढतो व माणसातला माणूसपणा नष्ट होऊन माणूस हतबल होत असतो. तर कधी कधी समजूतदार पणाने आपली चूक नसतानाही काही वेळा शांत बसणे योग्य असते. कारण जोपर्यंत समोरचां व्यक्ती आपला मन मोकळा करत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही तो पर्यंत समजदारीने चूप राहिलेले बरं असतें आणि चूक करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला माणसात समजुतदारपणा लागतो. मग हा असायला वयचे बंधन नसते कारण काहीच वय वाढते.मात्र त्यांच्यातला समजूतदारपणा कधीच वाढत नाही.ते फक्त वया नी वाढतात समजूतदार पणाने नाही.म्हणून जिथे आपली चूक नसते तिथे समोरच्या व्यक्तीला आपले बाजू समजावून सांगणे गरजेचे नाही. कारण अनेकदा ती व्यक्ती आपल्याला समजून घेणे इतपत ती समजदार नसते. एक दिवस ह्याचं मात्र समजदार पणाचां काही व्यक्तीचां जास्त फायदा घेतात तेव्हा शांत चित्ताने समजूतदारपणा आयुष्यात आलेले अनुभवाने जगतो आणि शिकतो.दुःखाचे दिवस सुखात परिवर्तन करतों.एवढी ताकत समजूतदार पणात असते.त्यामुळेच माणसातल्या समजूतदार पणाला आयुष्याची खरी सुखाची गुरुकिल्ली समजली जाते. त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर सुखी व्हायचे असेल तर, प्रत्यके व्यक्तीने उर्मटपणा नाही तर, समजूतदार पणाने घ्या...!! समजूतदारपणाचां दागिना परिधान करा..!! जीवनात नक्की सुख समृध्दी नांदेल...!!!

प्रा.छाया तानबाजी बोरकर 

अर्जुनी/ मोरगाव जिल्हा/ गोंदिया.

Post a Comment

0 Comments