शिक्षक
जसा मुर्तीकार देतो
मुर्तीला सुंदर आकार
तसा शिक्षक देतो
विद्यार्थास ज्ञान सार...१
देशाच्या प्रगतीला
शिक्षकांचा हातभार
शिक्षणाने विद्यार्थी
जगी लावी चांदचार...२
शिक्षकाविना ज्ञाना
नसे काहीच अर्थ
धावत्या ह्या जगात
कोण जिंकेल शर्थ?...३
खाणितला हिरा
पैलूने मौल्यवान
शिक्षकाच्या ज्ञाने
विद्यार्थी ज्ञानवान...४
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments