प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
पुणे जिल्हा परिषद पुणे मॉडेल स्कूल व आदर्श शिक्षक आणि अध्यक्ष चषक पुरस्कार सोहळा सभारंभ शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी गणेश कला-क्रीडा सभागृह,स्वारगेट पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि पालकमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार, शालेय शिक्षणमंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे व विधान परिषदेच्या उपसभापती मा.ना.डॉ. निलमताई गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष मा.ना.आण्णा बनसोडे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. गजानन पाटील, कार्यक्रमाचे नियोजन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.चंद्रकांत वाघमारे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.श्री.विशाल पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) मा.श्री.श्रीकांत खरात, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. श्री.भाऊसाहेब कारेकर, कार्यक्रमाचे आयोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा.श्री.संजय नाईकडे यांनी केले.
पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक व पश्चिम आदिवासी भागातील सह्यादीच्या निसर्ग सौंदर्यांनी नटलेल्या तसेच शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिवजन्मभूमीत असलेल्या दुर्गम आदिवासी भागातील सर्व भौतिक सुविधांनी संपन्न असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल, केंद्र उच्छिल बीट आपटाळे ता. जुन्नर, जि. पुणे येथील सर्व शिक्षकांचे अथक परिश्रम व त्यांना खंबीर साथ शालेय व्यवस्थापन समिती व समस्त पालक आणि ग्रामस्थ यांनी केली आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या जडणघडणीत विविध सेवाभावी संस्था, अधिकारी पदाधिकारी यांचे लाभलेले अनमोल योगदान यामुळे शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ या वर्षाचा जिल्हा परिषद पुणे यांचा अतिशय असणारा मानाचा अध्यक्ष चषक पुरस्कार पहिली ते आठवी गट मोठा गट तृतीय क्रमांकाने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले याचा मनस्वी आनंद शाळा व पालकांना होत आहे.
मागील पाच वर्षांमध्ये उत्कृष्ट परसबाग तालुकास्तरीय स्पर्धा द्वितीय क्रमांक पुरस्कार सन २०२१-२२, तालुका गुणवंत शिक्षक व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सन २०२१-२२ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पुरस्कार सन २०२३-२४, यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जिल्हास्तरावरील यशस्वी कामगिरी शैक्षणिक गुणवत्ता विविध उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम पश्चिम भागात शाळा असून देखील तेथील बहुतेक सुविधा शालेय दप्तर संगणक कक्ष परिसर अंतरंग बहिरंग विद्यार्थ्यांना अंगी असणारे भौतिक क्षमता त्यांचे असणारे गुणवत्ता ही राज्यापर्यंत वरिष्ठ अधिकारी यांनी तपासणी केली असता शाळेचा विद्यार्थ्यांचा कौतुक सातत्याने केले आहे लोकसहभागातून विविध शालेय भौतिक सुविधा करण्याचं काम त्याचप्रमाणे जिल्हा परिषद यांच्या विविध निधीतून मोठ्या प्रमाणामध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचे काम या शाळेत झाला आहे शिक्षणाची असणारी जिद्द चिकाटी व त्यांच्या असणारे योगदान त्यांना सर्व पालक वर्ग ग्रामस्थ शालेय समिती यांचा असणारा अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळेच शाळा जिल्हापर्यंत पोहोचली आहे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा व मार्गदर्शन जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. अमोल जंगले प्र.गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, आपटाळे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग व केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे यांनी केले आहे.
अध्यक्ष चषक तृतीय क्रमांक पुरस्कार स्विकारताना शाळेचे मुख्याध्यापक श्री अन्वर सय्यद, पदवीधर शिक्षक श्री. सुभाष मोहरे उपशिक्षिका स्मिता ढोबळे, आरती मोहरे तर हॅपी स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा स्नेहल चोरडिया, शालेय समितीचे अध्यक्ष सचिन नवले, मा.अध्यक्ष शरद नवले, ग्रामस्थ नितीन भालेराव, शालेय समिती सदस्य रवींद्र भालेराव व शिवाजी नवले यांसह गावातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments