Type Here to Get Search Results !

शिवदुर्ग ट्रेकर्स यांजकडून मुंढेवाडी शाळेस शैक्षणिक साहित्य वाटप...

 


प्रतिनिधी | प्रा. प्रविण ताजणे सर

शिवदुर्ग ट्रेकर्स च्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या बांधवांनी आदिवासी भागातील जि. प. शाळा मुंढेवाडी या शाळेला स्कुल बॅग, वह्या, कंपास पेट्या,पेन, पेन्सिल, पाणी बॉटल, जेवणाचे डब्बे इत्यादी साहित्य मे महिन्यातच पोहोच केले होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांनी आनंदात शाळेत यावे. पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ देऊन नावागतांचे स्वागत करण्यात आले. तसेच गोरगरीब मुलांचे अध्ययन सुरु व्हावे, शैक्षणिक साहित्याशिवाय शिक्षण अपुरे राहु नये या उद्देशाने साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवदुर्ग ट्रेकर्स चे प्रतिनिधी श्री.नामदेव गवळी, श्री.निखिल ढोरे पुणे, मुख्याध्यापक ज्ञानदेव दाभाडे सर, भागुजी शिंगाडे सर, यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण मुंढे, सदस्य होनाजी मुंढे, अर्जुन मांडवे,बबन लांडे, सखाराम मांडवे,संगीता मुंढे, सविता मुंढे, मंगल मुंढे, ऋतुजा मुंढे,सुभाष मुंढे, भाऊ मुंढे, नामदेव मांडवे,संदिप मुंढे, शामराव मुंढे,चंद्रकांत मुंढे विद्यार्थी व अंगणवाडी ताई आशा मुंढे व शारदा लांडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments