Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत कार्यक्रम संपन्न.



प्रतिनिधी सुराळे: शरद शिंदे

आज १६ जून नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रथम दिवस. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फेटे बांधून वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. गुलाब पुष्प, फुगे, खाऊ, नवीन पाठ्यपुस्तके व नवीन गणवेश देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.



मध्यान्ह भोजनामध्ये गोड जिलेबीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी आपटाळे केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश भवारी साहेब कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बन्सीशेठ चतुर, अंकुशशेठ चव्हाण, राहुल मातेले, सुनिल गाडेकर, सलमान इनामदार, अंगणवाडी ताई शिलाताई मातेले यांच्यासह पालक, ग्रामस्थ व शिक्षक वृंद उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments