कुमशेत जुन्नर | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभानिमित्त पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभातफेरीने झाली. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळ्यांनी सजावट केली. ज्ञानज्योती क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून औपचारिक कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य आणि पत्रकार मा. राजेश डोके होते. यावर्षी पहिलीत एकूण १० बालकांनी प्रवेश घेतला असून १००% प्रवेशाचे ध्येय गाठल्याबद्दल शाळेचे विशेष कौतुक करण्यात आले.
पहिलीत नव्याने दाखल झालेल्या बालकांना पाठ्यपुस्तक, वही, पेन्सिल आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच इ. २ री ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात महेंद्र वाणी, मयुर भगत आणि अंकुश डोके यांनी मिळून १५०० रुपये शैक्षणिक साहित्यासाठी दिले. तर संदिप डोके यांनी सर्व विद्यार्थ्यांना आयकार्ड देण्याची जबाबदारी स्वीकारली.
विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. शिक्षणाच्या प्रवासातील त्यांच्या पहिल्या पावलाचे स्मरण म्हणून "हाताचे व पायाचे ठसे" घेऊन "शिक्षणाच्या वाटेवर माझे पहिले पाऊल" या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्याम सरांनी केले. अध्यक्ष मा. राजेशभाऊ डोके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री. गणेश डोके, विकास दुधाळ, काजल डोके, इनामदार भाभी, संदीप डोके, अंकुश डोके, महेंद्र वाणी, मयुर भगत, अंगणवाडी ताई संजीवनी नाईकवाडी यांचे विशेष सहकार्य लाभले.
विद्यार्थी, पालक, माता-पालक संघ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगतेस यशवंत घोडे सरांनी उपस्थितांचे आणि दानशूर व्यक्तींचे आभार मानले तसेच नवीन शैक्षणिक सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments