पुण्याचे नामांकित लेखक आणि कथाकथनकार श्री. दिलीप कजगांवकर यांच्या श्रवणीय कथांनी डोंबिवलीकरांना मंत्रमुग्ध केले. डोंबिवली येथील आदर्श जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने, टिळक रोडवरील ग्रेन अॅंड प्रोव्हिजन मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात दिनांक १४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या श्री दिलीप कजगांवकर यांच्या कथाकथन कार्यक्रमास डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संघाचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण कुडे, उद्योग महर्षी श्री किरण पिंगळे, श्री नरहर शिरूडे, श्री व्ही एस वाणी सर, प्राध्यापक रविंद्र बोंडे, डॅा. संजय धामणे, श्री प्रदिप कोठावदे, कवयित्री सौ कालिंदी वाणी, सौ कुडे, श्रीमती जयश्री चितोडकर आणि अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमास उपस्थित होते.
श्री दिलीप कजगांवकरांनी वृध्दाश्रम, आई, साडी खरेदी, संशय, अबोली, गुंता अशा विविध विषयांवरील स्वलिखित गोष्टी सांगताना श्रोत्यांना खिळवून ठेवले. या गोष्टी लिहिताना आदरणीय व्ही एस वाणी सरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
श्री बाळकृष्ण कुडेंनी उपस्थितांचे स्वागत केले तर श्री विवेक वाणींनी आभार प्रदर्शन केले.
श्री किरण पिंगळे, प्राध्यापक रविंद्र बोंडे आणि डॅा संजय धामणे यांनी कार्यक्रमावर व्यक्त केलेल्या भावनात्मक प्रतिक्रियांनी उपस्थितांचे मन जिंकले.


Post a Comment
0 Comments