प्रतिनिधी घोडेगाव | सुरंजन काळे
आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, घोडेगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा शिक्षिका ज्योती रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांची प्रात्यक्षिके केली. यामध्ये विद्यालयाचे शिक्षक देखील सहभागी झाले विद्यार्थ्यांना योगासने व त्यांचे आपल्या शरीरास होणारे फायदे या संबंधी माहिती सौ ज्योती मॅडम यांनी विद्यालयाच्या प्राचार्या मेरीफ्लोरा डिसोजा यांनी मुलांना व्यायामाबद्दल महत्व सांगून आपल्या दैनंदिन जीवनात सकस आहाराचे महत्त्व देखील पटवून दिले .रोजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात सर्वांनी व्यायामास महत्त्व देऊन रोजच्या रोज योगासने केली पाहिजेत असे मार्गदर्शन उपप्राचार्या रेखा आवारी यांनी केले.
याप्रसंगी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष एडवोकेट श्री संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव श्री विश्वासराव काळे, समन्वय समिती चेअरमन श्री राजेश काळे, वस्तीगृह कमिटी चेअरमन श्री सूर्यकांत गांधी, संस्थेचे खजिनदार श्री सोमनाथ काळे विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे,संचालक अजित काळे,श्री.अक्षय काळे,श्री.वैभव काळे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या वतीने पालकांसाठी व प्री प्रायमरी विभागाच्या बालचमुंसाठी साठी योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ऑनलाइन योगासनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते. विद्यालयाच्या शिक्षिका सौ.रश्मी गाडीलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री विजय काळे सर यांनी योग विषयी माहिती सांगितली. श्री.उदय बेंडारी सर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास तेजश्री येंधे , संतान असांगी ,चेतन पोखरकर , समीर मुजावर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा, उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी, पर्यवेक्षिका श्रीमती वंदना वायकर यांनी मार्गदर्शन केले.
Post a Comment
0 Comments