अभिजात
बळ आहे तुझ्या रक्तात ,
मानवता आहे तुझी जात,
धरणीशी तुझं आहे नातं,
तू आहेस एक अभिजात.
पोलाद तुझ्या काळजात,
शक्ती तुझ्या कणा –कणात,
तू पेटत्या दिव्याची वात,
तू आहेस एक अभिजात.
तुझा कोणीच नाही या जगतात,
फक्त देव लपलाय आई–बापात,
मार्ग शोध तू तुझ्या देवात,
तू आहेस एक अभिजात.
भिजलाय तुझा बाप घामात,
दमलाय तुझा बाप कामात,
तू ही आहेस मग्न कष्टात,
तू आहेस एक अभिजात.
दिवस प्रत्येकाचे येतात,
ध्येय ठेव तू मनात,
झेप घेशील तू ही गगनात,
तू आहेस एक अभिजात .
➖➖➖➖➖➖➖➖
–विशाल संघपाल गर्दनमारे (सिद्धार्थानुज)
इयत्ता:- ९ वी
शाळेचे नाव :-श्री टागोर माध्यमिक विद्यालय,भोसरी,पुणे.
Post a Comment
0 Comments