पाऊसपाणी
प्रश्न विचारले जाती
आहे का पाऊसपाणी?
मिळे उत्तर अनेक
ह्याच आपल्या जीवनी...१
पाणी पाणी पावसाचे
नित्य वाया सर्व जाते
कर्म असे घडताच
कर्म फळ पुढे येते...२
थेंब थेंब पावसाचे
महत्वाचे जीवनात
रिमझिम वर्षा गाणे
खळखळ वाहतात...३
कधी धो धो पडणारा
कधी कोरडा दुष्काळ
आपलेच कर्म नडे
होते रहाट बेहाल...४
पाणी आपले जीवन
घडे त्यानेच कहाणी
सांभाळता निसर्गास
नसे त्याची मनमानी...५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments