Type Here to Get Search Results !

बेलसर ते भिवाडे दरम्यान रस्त्याची दुर्दशा, रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता.



बोतार्डे | जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेलसर ते भिवाडे दरम्यानचा रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला असून रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता असचं चित्र सध्या आहे.

रस्त्यातील खड्डे इतके मोठया प्रमाणात झाले आहेत की, खड्ड्यामध्ये पाणी व चिखल साचलेला आहे, त्यामुळे या रस्त्यावरून वाहनचालकांना मोठी कसरत करून जावे लागते, या रस्त्याची मागील एप्रिल ते मे महिन्यात खडी व मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती मात्र त्यानंतर महिनाभरात या रस्त्याची पुरती वाट लागून गेली, वास्तविक संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यांची साधी पाहणी केली नाही, सध्या पावसाळा सुरू असून रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना व वाहनचालकांना फुकटचा मनस्ताप होतं आहे.



रस्त्याच्या दुतर्फा मोठया प्रमाणात काटेरी झाडे व वेली वाढलेल्या आहेत यामुळे समोरून येणारी व जाणारी वाहने एकमेकांना दिसतं नाहीत यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या गोष्टीची वेळीच दखल घेऊन संबंधित सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागाने लक्ष देऊन या रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे व रस्त्यावरील पाणी काढून द्यावे अशीच नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments