झुंज मानवतेची...!
माणुसकीने वागणे
म्हणजे मानवता
त्यासाठी झुंज देणे
म्हणजे खरी एकता.....१
एकतेविना आज
अनेक समस्या असे
एकीचे सर्व बळ
मानवात उरले नसे.....२
पानिपत मोहिमेवर
वेगवेगळ्या चुली
एक नसल्यामुळे
गेले सर्वच ते बळी.....३
महत्वाचा मानवधर्म
बाकींना गौण समजा
खरी झुंज देण्यासाठी
स्वार्थ करावा वजा.....४
जोतो आज भाजे
स्वार्थाची ती पोळी
झुंज सार्थ करण्या
ओळखावी ती खेळी.....५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments