बातमी संकलन - पंकज सरोदे
भारतीय बौद्ध महासभा शाखा आंबेगाव तालुका आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, व्यक्तिमत्त्व विकास शिबीर त्याचप्रमाणे राजश्री शाहू महाराज जयंती सामाजिक सभागृह, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर अवसरी खु. ता. आंबेगाव जि. पुणे येथे संपन्न झाली.सकाळी समता सैनिक दलाची मान वंदना झाली, प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन झाले व शेवटी सन्मान सोहळा झाला. दहावी बारावी व ईतर परीक्षेत यश संपादन केलेल्या 51 विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले.
यासाठी मार्गदर्शन करणारे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आद. ज्ञानोबा कांबळे, रविंद्र अभंग, पि.के पवार, दलितानंद थोरात हे केंद्रीय शिक्षक आले होते. पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रविकांत रणपिसे,माजी तालुकाध्यक्ष कृष्णाजी साळवे भीम जयंती महोत्सव संस्था अध्यक्ष विकास मोरे,आर. पि.आय. जिल्हा उपाध्यक्ष नंदाराम वाघमारे,कार्याध्यक्ष शिवाजी इंदोरे,सचिव लहु लव्हाडे,सामाजिक कार्यकर्ते विनोद रोकडे,रमेश घोडेकर हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश वाघमारे हे होते, सूत्रसंचालन सचिन ढोणे तर आभार नरेश कसबे यांनी मानले.
शिबीर आयोजित करण्यासाठी गणेश वाघमारे,पूनम वाघमारे, आतिश ढोणे, तानाजी आस्वारे,सागर गायकवाड, यश फाले,पंकज सरोदे,बंडू फाले,गौतम खळे,संजय अंकुश, मंगेश ढोणे, यांनी प्रयत्न केले. दहावी बारावी नंतर काय ह्या विषय सर्वानी मार्गदर्शन केले. त्यात शैक्षणिक जिवन कसे जगावे त्याच प्रमाणे कोणत्या विभागाचे शिक्षण घ्यावे, कोणती डिग्री कशी मिळवायची ह्यावर प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात आले. पालकांनी मुलाना काय मार्गदर्शन करावे, अभ्यासात कशी मदत करावी ह्यावर महेश वाघमारे यांनी माहिती दिली, आजच्या युगात टेक्निकल शिक्षण गरजेचे आहे त्यात सर्वानी मार्ग निवडावा असे गणेश वाघमारे यांनी सांगितले.
मेडिकल शिक्षण ही काळजी गरज आहे यात ज्यांना शक्य आहे त्यांनी मेडिकल शिक्षण घ्यावे असे जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी तालुक्यातील आहुपे पासून लाखनगाव पर्यंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजावून देण्यात आले, "*शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते पितो तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही* " असे महेश वाघमारे यांनी अध्यक्षीय भाषणात बोलले.यानंतर सन्मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली.
Post a Comment
0 Comments