आजची तरुण पिढी.
आजची तरुण पिढी आहे आंतरजाळात रमणारी🖥️📱
युट्युब फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप मध्ये स्वतःला गुंतून घेणारी📲
जंक फूड स्ट्रीट फूड वर ताव मारणारी🥞
गुगलवर मेटा आय द्वारे होमवर्क पूर्ण करणारी
वडीलधाऱ्या व तसेच मोठ्यांचा अनादर करणारी
लो एम असणारी आणि ध्येयासाठी कष्ट न करणारी
फक्त मी आणि मीच एवढाच विचार करणारी
आपल्याला फक्त आणि फक्त इन्स्टंट कसे मिळेल हाच एकमेव विचार करणारी
क्रिएटिव्ह वर्क आणि स्किल नसणारी
डिग्री आणि सर्टिफिकेट च्या मोहात फक्त कोर्स कसा पूर्ण होईल याच्याच मागे धावणारी
नवनवीन येणाऱ्या फॅशन आत्मसात करणारी
तसेच कोणत्याही गोष्टीची पॅशन व व्यक्तिमत्व विकास नसणारी
एखादी गोष्ट अवगत न झाल्यामुळे टोकाची भूमिका घेणारी
पण थोडंसं या पलीकडे डोकावून पाहिलं ना तुम्हाला दिसेल आजची स्किल असलेली आणि डेव्हलप करणारी तरुणाई......
ती म्हणजे अशी....
क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर सारखी षटकार मारणारी 🏏
शिक्षण क्षेत्रातील रेणू गावस्कर व रेणू दांडेकर यांच्यासारखी भरीव कामगिरी करणारी
व शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे हे पटवून देणारी
सुनीता विल्यम्स यांच्याप्रमाणे लहानपणापासून अवकाशात भरारी मारण्याचे स्वप्न साकार करणारी🛸🚀
पृथ्वीला ऑर्बिट करणारी
हो नक्कीच अशी तरुणाई आपल्याला लाभेल आकाशाला गवसणी घालणारी
आणि आपल्या राष्ट्राला बळकट करणारी.
कवयित्री-सौ पल्लवी निलेश रासकर
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.
Post a Comment
0 Comments