Type Here to Get Search Results !

लेखिका प्रा. छाया बोरकर लिखित विचारमंथन क्र.३११



विचारमंथन क्र.३११

जीवनाच्या वाटेवर जगतांना माणसाला लहान मोठ्या प्रसंगाशी तडजोड करत अस्तित्वात असणाऱ्या परिस्थिती दोन हात करत तडजोड करतो तेव्हा,परिस्थितीशी तडजोड करत असताना काही व्यक्ती,कधी कधी मनाने खचून जातात जीवन जगन कठीण होते आणि सुंदर असणारं मानवी जीवन नकोस वाटते.तेव्हा मनाने दुःखी कष्टी असणारी व्यक्ती ही कशी जगते, कशी राहते, तिला काय दुःख आहे. याच्याशी दुनियेला काही घेणं देणं काही नाही...? याचा जरा ही विचार न,करता काही व्यक्ती त्यांच्या मनाला लागेल त्यांना नाही तसे, कधी टोचून बोलतात आणि त्यांची टिंगल टवाळकी करत चार चौघात स्वतःला हुशार समजतं नाही तसे, कमी लेखून उतरवून पार करत नाही तसे बोलतात... तेव्हा त्यांच्या बोलण्याचा त्रास त्यांना होतो. तरी,त्या त्यांच्या बोलण्याला उलट प्रतिउत्तर न, देता निमूटपणे प्रत्येक वेळी सहन करतात.मात्र प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीची एक मर्यादा असते. एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही.त्याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे,किंवा तिला समजतं नाही, तिला बोलता येत नाही, असा होत नाही. तर,कधी स्वभाव,कधी संस्कार,तर कधी विचार आड येत असतात की,ज्यां परिस्थितीशी ती व्यक्ती तडजोड करत जुळवून घेत असतात आणि शांत राहतात.याचा अर्थ म्हणजे दुबळेपणाचे लक्षण नाही तर, संयम, सहनशीलता सोडून कोणाला काहीही बोलण्यापेक्षा शांत राहिलेले केव्हाही बरं... या विचाराने ते गप्प रहातात. कारण याने मनात ना, अढी येते ना,नात्यात कटूता आणि बोलणाऱ्याला कधी ना कधी कडून चुकते..सहन करणारी माणसं लहान नसून महान असतात, त्यामुळे माणसांने सहनशीलता अंगी बाळगून शांत आणि संयम रहा.एक दिवस वेळ बरोबर सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देते...!!!

प्रा. छाया तानबाजी बोरकर 

अर्जुनी/ मोरगाव. जिल्हा/ गोंदिया.

Post a Comment

0 Comments