बळीराजाची दानत
काढू नका लायकी बळीची,
तो तुम्हाला पुरून उरेल.
त्याची दानत मोजता मोजता,
तुमची अवघी हयात सरेल...१
घाम गाळून पिकवित असतो,
काळ्या उदरा मधून मोती.
जगताला पुरवीत असतो,
भाजी भाकरी आणिक रोटी...२
मूठभर दाण्याचे तो,
करत असतो सव्वा खंडी.
त्याच्या जीवावरच आहे,
तुमच्या अंगात चड्डी बंडी...३
त्याच्यामुळेच आला आहे,
तुमच्या जगण्याला ही अर्थ.
त्याच्या वाचून करावी लागेल,
जगण्यासाठी पुन्हा शर्थ...४
आपल्या प्रत्येक घासा वरती,
त्याचाच अधिकार आहे फक्त.
विचार करून बोला पुन्हा,
सूर्या तुम्हा ताकिद देतो सक्त...५
© खंदारे सुर्यभान गुणाजी
नांदेड- 9673804554
Post a Comment
0 Comments