Type Here to Get Search Results !

पूर कुकडेश्वर शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप



जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा पूर कुकडेश्वर शाळेतील सर्व विद्यार्थांना मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांचे वतीने मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या साहित्यामध्ये उत्तम दर्जाचे दफ्तर, पाटी, वह्या,कंपासपेटी,पेन्सिल बाॅक्स, खोडरबर, शार्पनर इ.साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले.या शाळेतील विद्यार्थी हुशार व बोलके असून शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्कृष्ट असल्याचे शिवनेर भूषण विनायक खोत सरांनी मनोगतात सांगितले.

याप्रसंगी पूर गावच्या सरपंच उषाताई चिमटे,उपसरपंच ताराचंद दिवटे ,शिवनेर भूषण विनायक खोत सर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक दुंदा दिवटे गुरूजी,शाळा समितीचे अध्यक्ष प्रदीप दिवटे ,उपाध्यक्ष एकनाथ दिवटे,दामूनाना चिमटे,सचिन दिवटे,हिरामण पोटे, सुनिल दिवटे,निलेश चिमटे,जिजाबाई गवारी तसेच दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान चे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन जुन्नर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक सचिन मुळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक चंद्रकांत पारधी व गुणवंत विद्यार्थीनी सायली दिवटे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments