माझ्या मनातील फुले
कसं असतं ना या सुंदर
फुलांच आयुष्य,
झाडांवर वेलीवर असताना,
एक दिवस बहरलेलं,
एक दिवस उमललेलं,
एक दिवस गंधाळलेलं,
एक दिवस दरवळलेलं,
एक दिवस गुंफलेलं,
एक दिवस माळलेलं,
नी एक दिवस शेवटी तोडल्यानंतर,.....
देवाच्या चरणी अर्पण केलेलं,
केसांत माळलेलं, कोमेजलेलं, सुकलेलं .
Post a Comment
0 Comments