मानवी जीवनाच्या वाटेवर जगतांना माणसाने संगत चांगल्या व्यक्तिशी करावी कारण "जशी संगत तशीच पंगत" यांनुसार चांगल्या संगतीमुळे माणूस सुधारतो आणि बिघडतो व जीवनाला आगडी वेगळी कलाटणी देत जीवनाची दिशा निर्धारित करत असतो.कारण माणूस हा सर्व प्राण्यांमध्ये हुशार, बुद्धिमान प्राणी असून तो विंचू ,सपापेक्षा विषारी आहे. तो कधी एका ताटात खाऊन कधी, केव्हा विष कालवेल आणि जीवनाला हानी पोहचवेल सांगता येत नाही. म्हणजेच चुकीची संगत ही माणुसकीला काळीमा फासणारी व बदनाम करणारी ठरू शकते. त्यामुळे माणसाने संगत ही परिसा सारखी करावी जी लोखंडाला स्पर्श करतात लोखंडाचे सोने होते.तसेच एखाद्याची संगत आपल्या जीवनाचे सोने करेल अशी संगत करावी.जसे अंगुलीचा,अंगुली माला झाला.वाली, वाल्मिक झाला तसेच एखाद्याच्या चांगल्या संगतीमुळे हैवानचा माणूस होऊ शकणार अशी संगत करावी. संगतीमुळे व्यक्ती सुधारतो आणि बिघडतो. म्हणून म्हणतात ना " *ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वाण नाही पण गुण लागला"* याचप्रमाणे माणूस संगतीमुळे एक दुसऱ्या पाहून त्या प्रमाणे वागतो व शिकतो आणि होत्याच नव्हतं करतो व जीवनाला कलाटणी देतो जीवनाची किंमत ठरवतो.जसा पावसाच्या थेंब गवतावर पडला तर त्याचा दंवबिंदू होतो. तोच थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याची वाफ तयार होते. आणि शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होते. थेंब तोच असतो मात्र तो कुठे पडला हे महत्त्वाचे असते.तशीच संगत महत्त्वाची असतें संगतीने माणूस बिघडतो आणि सुधारतो पण जसा एक आंबा सडला तर दुसराही आंबा सडतो आणि मग संपुर्ण आंबे नाशले जातात तशी संगत असते सोन्याची किंमत हे लाख करोड जरी असली तरी जर तिला डाग दिला तर..! त्याचा दर्जा कमी होतो. त्याचप्रमाणे जीवन अनमोल आणि सोन्यासारखे आहे. तिला संगतीमुळे गालबोट लागले तर अनमोल हिऱ्यासारखे सुंदर जीवन नष्ट होण्याच्या मार्गावर येते अनमोल जीवनाची किंमत शून्य होतें.त्यामुळे माणसाने संगत प्रामाणिक,विश्वासू, कष्टाळू ,मेहनती अशा व्यक्तीशी संगत करावी.. मग तो गरीब असला तरी चालेल चुकीची संगत हे आयुष्याला लागलेली कीड आहे. जी अधोगतीकडे नेत जीवनाची नासधूस करत.. माणसाचा मानपान धुळेच मिळवते.त्यामुळे चुकीच्या वळणावर नेणारी संगत टाळा, तरच जीवन सार्थक होणार ...!!!!!
🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रा. छाया तानबाजी बोरकर
अर्जुनी/ मोरगाव जिल्हा/ गोंदिया

Post a Comment
0 Comments