हिरवी वसुंधरा
वर्षाधारा पडता
संजीवनी बीजांना।
वाढ होता पुर्ण
अन्न मिळे जीवांना॥१॥
गवत,वेली वाढून
हिरवळ पसरे।
जनामनात घुमे
चैतन्याचे वारे॥२॥
पाण्याची खळखळ
नदी व ओढ्यात।
भूमीला देत देत
मिळे सागरात॥३॥
हिरवे होते रान
पडता पाऊसधारा।
शृंगाराने नटे हि
हिरवी वसुंधरा॥४॥
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments