कवीचे मन
कवीचे मन म्हणजे विचार रुपी धन
जणू काही पेनात भरलेले शब्दरूपी धनं
कागदावर टिपलेले गत नी वास्तवकाळातील क्षण
कवीचे मन म्हणजे बोध आणि अबोध मनातील भावनांचे बनं
कवीचे मन म्हणजे जणू काही पावसातही पडलेलं ऊन
जणू काही सांगते श्रावण सरींची खूण
कवीचे मन म्हणजे जणू काही देव दानवां मध्ये झालेले समुद्रमंथन
आणि त्या समुद्रमंथनातून
कवीला मिळालेले अमृतारुपी प्राशन
कवीच्या मनाचं व्यक्त होताना राहत नाही स्वतःवर भान
म्हणूनच तर त्याला समाजामध्ये मिळतो साहित्यिक म्हणून सन्मान🙏
कवयित्री-सौ पल्लवी निलेश रासकर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर
Post a Comment
0 Comments