Type Here to Get Search Results !

कवी सुरेश शिर्के लिखित काव्य रचना आभाळ फाटले.



 आभाळ फाटले


चातका सारखे

पाहणारे वाट

धोधो पावसाने

झालेत सपाट.....१


जिकडे तिकडे

पाणीच पाणे रे

पूर येवूनिया

आक्रोश माजे रे.....२


कुठे दरडिचे

जिवावर घाले

काही क्षणांतच

जीवन संपले.....३


पिकं ही पाण्यात

सर्वस्व बुडाले

दानांचे बाजार

नेत्यांनी मांडले.....४


पूरग्रस्त सर्व

मागेच राहिले

चोर लुटारूंनी

हात साफ केले.....५


वाटता सर्वांना

हाती किती आले

अन्यथा म्हणावे

आभाळ फाटले.....६


सुरेश शिर्के

खारघर,पनवेल

Post a Comment

0 Comments