Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) महाराष्ट्र राज्य जुन्नर तालुका व मातृभूमी बेघर महिला आघाडी रजि यांच्या वतीने भारतीय सैनिक झिंदाबाद गौरव सभा संपन्न.....

 


सीमेवर बांधव आपले रक्षण करतात, म्हणून आपण सुखी आहोत- माजी आमदार अतुल बेनके.

बेघरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध- आमदार शरद सोनवणे.

जुन्नर | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य जुन्नर तालुका व मातृभूमी बेघर महिला आघाडी रजि जुन्नर तालुका यांच्या वतीने आज शनिवार दिनांक ०७ जून २०२५ रोजी सकाळी ११. ४५ वाजता राजमाता जिजाऊ सभागृह जुन्नर येथे भारतीय सैनिक झिंदाबाद गौरव सभेचे आयोजन करण्यात आले होते.



यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली, 

या कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष संभाजी साळवे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र आर. पी. आय यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व प्रस्तावनेतून शहीद संदीप गायकर यांना आदरांजली वाहून देशाच्या रक्षणाकरिता जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यामुळे आपण भारतीय त्यांच्या आठवणीत राहून देशातील जनता सुखाने राहत आहे, ब्राम्हणवाडा या गावातील संदीप गायकर हे मातृभूमीसाठी शहीद झाले त्यांच्या कुटूंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माजी आमदार अतुल बेनके व रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांच्या हस्ते वडिलांना ट्रॉफी व भारतीय तिरंगा देऊन सन्मानीत करत आहोत असे साळवे म्हणाले जुन्नर तालुक्यातील आज ४० वर्ष होऊन गेले तरी बेघरांचा प्रश्न सुटलेला नाही तरी तो सुटण्यासाठी विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी प्रयत्न करावा असे देखील संभाजी साळवे म्हणाले, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार यांनी शहीद संदीप पांडुरंग गायकवाड यांना आदरांजली वाहिली व गायकर कुटूंबाला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी बेनके म्हणाले व दहा हजार रुपयांची वैयक्तिक मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले बेघरांचा प्रश्न पोटतिडकीने सोडविण्यासाठी आमदार शरद सोनवणे आणि आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे देखील त्यांनी उपस्थित जनतेला सांगितले, सामाजिक कार्यकर्ते सतीश कसबे यांनी त्यांच्या खास शैलीतून भारतीय सैनिकांना वंदन करून ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देऊन सभेला उदबोधन केले, नगरसेवक मधुकर काजळे यांनी सभेला उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले व सैनिकांबद्दल विचार मांडले, पोपट सोनवणे सर यांनी भारतीय सैनिकांना वंदन करून सैनिकांबद्दल विचार व्यक्त केले, देवरामजी मुंढे साहेब आदिवासी शिक्षण संस्था अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातूण भारतीय सैनिकांना वंदन करत गौरव सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले, गौतमजी लोखंडे उपाध्यक्ष पुणे जिल्हा आर. पी. आय. यांनी देखील सभेला उपस्थित राहून भारतीय सैनिकांना वंदन करून आपले विचार मांडले, दिलीप वाघमारे, उज्वलाताई शेवाळे संस्थापक अध्यक्ष तनिष्का ग्रुप, वैष्णवी चतुर राष्ट्रवादी महिला आघाडी नेत्या, अनिल सोनवणे, संपत गायकवाड सचिव आर. पी. आय पुणे जिल्हा राजश्रीताई शिवले अध्यक्षा सावित्रीबाई फुले पतसंस्था जुन्नर वसंत साळवे, सतिश शिंदे ( पत्रकार )या मान्यवरांनी भारतीय सैनिक झिंदाबाद गौरव सभेत आपले विचार व्यक्त केले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपट राक्षे अध्यक्ष आर. पी. आय जुन्नर यांनी भारतीय सैनिक कै. संदीप पांडुरंग गायकर यांना अभिवादन करून त्यांच्या कुटुंबियांना मायेचा आधार त्यांनी बोलताना दिला भारतीय सैनिकांबद्दल आपल्याला नेहमीच आदर सन्मान आहे असे राक्षे म्हणाले, जुन्नर तालुक्यातील बेघर लोकांना लवकरात लवकर घरे कशी मिळतील याबद्दल त्यांनी तालुक्याचे आमदार शरद सोनवणे व माजी आमदार अतुल बेनके यांना सांगितले, यावेळी कार्यक्रमाला संभाजी साळवे , पोपट राक्षे, सुरेश खरात, प्रवीण लोखंडे, वसंत साळवे, अनिल सोनवणे, संपत गायकवाड, सूरज वाघमारे, अजित साळुंखे, भगवान मकवाने, श्रीमती तारा वंजारी, ओंकार वंजारी, रमेश भंजोड, लक्ष्मण भंजोड, संतोष मकवाने, वसंत साळवे, के. के. आल्हाट, राजेंद्र आल्हाट,दत्तात्रय कसबे, मोहन मकवाने, बेबी जाधव, सुमन वायकर, मंदा सावंत, कुंदा बोकरे, ताई सोनवणे, आशा सोनवणे, छबुताई देठे, आशा मकवाने, शांता वाघमारे, नपिसा इनामदार, रेश्मा मनियार,मारुती वारे, राजू बनसोडे,, आर्यन राक्षे उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पिसे सर यांनी केले तर आभार पोपट राक्षे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments