प्रतिनिधी : सुरंजन काळे
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील दातांच्या दवाखान्यातील डॉ. हरिष खामकर यांनी दवाखान्यातील महिला मदतनीसचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
झाला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी सांगितले.
याबाबत फिर्याद महिेलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, २६ मे रोजी ही महिला मंचर येथील डॉ. खामकर यांच्या दवाखान्यात मदतनीस म्हणून कामावर रूजू झाली.
परंतु ६ जून रोजी डॉ. खामकर यांनी घोडेगाव येथील दवाखान्यात कामावर या असा मोबाईलवर मेसेज पाठविला. ही महिला घोडेगाव येथे कामावर असताना डॉक्टरांच्या केबिनमध्ये डॉ. खामकर यांनी
महिलेच्या दोन्ही गालावरून हात फिरवून तुझा चेहरा चांगला आहे असे म्हणून कंबर व मानेवर हात फिरवून जवळ घेवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक
सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक महेश पवार करत आहे.

Post a Comment
0 Comments