Type Here to Get Search Results !

घोडेगाव येथे मा. तहसीलदार व महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये महसूल लोक अदालत पार पडली



प्रतिनिधी : सुरंजन काळे

घोडेगाव - घोडेगाव येथे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय घोडेगाव येथे महसूल लोक अदालत पार पडली. तहसील कार्यालय मध्ये १२७ प्रकरणे प्रलंबित होती त्यातील ५२ निकाली निघाली व प्रांत कार्यालयातील ८८ प्रकरणे प्रलंबित होती त्यातील ८० प्रकरणे निकाली निघाली हे लोक आदालत श्री गोविंद शिंदे ( उप विभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव ) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. ग्रामीण स्तरातून लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता व सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी श्री .गोविंद शिंदे ( उप विभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव ) श्री संजय नागटिळक, तहसीलदार- आंबेगाव, श्री डॉ.सचिन वाघ ना. तहसीलदार ,श्री शांताराम किरवे ना. तहसीलदार, श्रीमती शांता बांगर ,ना. तहसीलदार, ॲड .श्री .समीर निघोट अध्यक्ष बार असोसिएशन आंबेगाव तालुका, ॲड श्री .श्रीराम बांगर जिल्हा अध्यक्ष भाजपा कायदा आघाडी,ॲड श्री. आर्वीकर साहेब उपस्थित होते 

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी इतर महसूल अधिकारी, कर्मचारी ,वकील, संघटना व पक्षकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments