आकुर्डी येथे मुक्कामी असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आज सकाळीच पुण्याकडे मार्गस्थ झाली. यामध्ये पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना राजगिरा लाडू, बिस्कीट पॉकेट, केळी व पाण्याची बॉटल वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी राजेश चौधरी, राहुल निघोट, शैलजा पवार, दादासाहेब वाकचौरे, बबन वाडेकर,गायकवाड साहेब यांनी विशेष पुढाकार घेतला.
यावेळी, गुणवंत कामगार शहराध्यक्ष महंमद शरीफ मुलाणी, खजिनदार बाळासाहेब साळुंके, भरत शिंदे, नंदकुमार धुमाळ, रघुनाथ फेगडे, पांडुरंग सुतार, संभाजी नाटक, सुनील पाटील, राजेश चौधरी, निवृत्त जेलर प्रकाश गडवे, पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, जिथे साहेब, तुपे साहेब, मंगेश वारके, तेजस सुडके, आकाश शिरसाट, निलेश अवधूते व पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे धार्मिक व सामाजिक महत्त्व जपत, सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव ठेवण्याचे आवाहन करण्यात केले.
Post a Comment
0 Comments