आचारा विचाराच्या सुंदर मानवीरुपी जगात जगतांना माणसांने आपले विचार हे सुंदर आणि पवित्र ठेवावे आणि निस्वार्थ भावनेने जगात वावरावे. कारण जगात माणसाची ओळख ही त्याच्या सुंदरता किंवा श्रीमंतीवरून होत नसून माणसाच्या विचारावरून होतें व तो कायम लोकांच्या आठवणी मेल्यानंतरही स्मरणात राहतो. जसे"मरावे परी किर्ती रुपी उरावे" याप्रमाणे लोकांच्या आठवणीत जिवंत राहतो. आणि आपल्या विचारांचा सुगंध चोहीकडे दरवळतो. "ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही" त्याचप्रमाणे चांगल्या विचाराची माणसं काळाच्या ओघात पडद्या आड झाली तरी, त्यांना विसरता येत नाही आणि कायम आठवणीत राहतात. त्यांच्यासारखे आपण सुद्धा व्हावे या सकारात्मक विचाराने आपण त्याच्या पावला वर पाऊल ठेवून चालत असतो आणि आपला जीवन सुखी संपन्न जगून हृदयातील जीवनातील अंधार दूर करतो. मात्र ज्याच्या विचारातच पाप आहे तो, जीवनात चांगले कर्म काय..?? करणार... आणि दुसऱ्याच्या कुकर्मात दुसऱ्यासाठी खड्डा खोदण्यात त्यांचे संपूर्ण जीवन जाते.आणि एक दिवस स्वतःच त्या खड्डयात पडतो. व सुखी संपन्न जीवनाला मुखतो. कारण चांगला विचार हा माणसाच्या जीवनाचा पाया आहे. कितीही वादळ वारा, संकटा आले तरी त्याला न जोमानता न, डगमगता खंबीरपणे आपल्या विचारावर ठामपणे तटस्थ उभा असतो.मग दुनिया इकडे ची तिकडे झाली तरी बेहत्तर .... !! या विचाराने प्रेरीत होऊन आपल्या विचारांवर त्या व्यक्ती पक्या असतात. हे त्या व्यक्तीची वागणूक त्यांच्या विचाराचे दर्शन घडवत असते.व प्रत्येक गोष्टीतील दृष्टिकोन हा त्यांच्या विचारांचे प्रतिक दर्शवत असतो. मग अशा व्यक्ती केवळ संपत्तीनेच नव्हे तर, उच्च विचाराच्या भक्कम पायावर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी करतात. त्यामुळेच जीवनाच्या वाटेवर चांगले विचारांचे माणसं हे कधीच एकटे राहत नाही. व खोटं बोलणाऱ्या पेक्षा गोड वाटत नसली तरी मानवी जीवनात चांगले विचारांचे माणसं हे कडूनिंबासारखा औषधीचं काम करतात. खोटे नाही तर सत्याच्या वाटेवर चालतात. समाजात आपल्या विचारांची छाप निर्माण करतात.यामुळे माणसाने आपल्या जीवनात चांगले विचार रुजवाल्याशिवाय मानवी जीवनाची प्रगती होत नाही. आणि ज्यांना स्वतःचे विचार बदलता येत नाही ते ते कशातच बदल घडवून आणू शकत नाही. मग कधी काळी वेळ काळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार आणि पिक जळून गेल्यावर पडलेल्या पाऊसांची किंमत राहत नाही. तशीच अविचारी माणसाची किँमत जगात राहत नाही. त्यामुळे माणसाने जीवनात अविचाराने नाही तर चांगल्या विचारांनी व चांगल्या कर्मानी जगा व चांगल्या विचाराने सामोर जा जीवन सुखी संपन्न होऊन जीवनात मान सन्मान मिळणार...
आणि मान सन्मान शिवाय या जगात कोणतीच गोष्ट नाही..
जी लाचारी पत्करू स्वीकारू देतं नाही आणि जीवनाची वाट लागू देतं नाही. . करोडो विकता येतं नाही म्हणून चांगल्या विचारांनी जगा व जगू द्या.!!!!
प्रा. छाया तानबाजी बोरकर
अर्जुनी/ मोरगाव जिल्हा/ गोंदिया

Post a Comment
0 Comments