पैंजण
छमछम वाजणारे
तालातील हे पैंजण
स्वर कधी वाटतात
प्रेमभरे हे गुंजन...१
हृदयात हे बंदिस्त
पैंजण ते प्रेयसीचे
ताल तो भुलवणारा
आठवण त्या क्षणांचे...२
लडिवाल बालीकाचे
छमछम ते स्मरण
सासराला जाता लेक
आठवती ते पैंजण...३
किलबिल पाखरांची
खळखळ ओढे झरे
वारा पानांचे पैंजण
निसर्गाचे गाणं स्मरे...४
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

Post a Comment
0 Comments