नभ दाटून आले
तप्त तप्त भूमी
वाफाळून निघाली
वाफ निघे वर वर
ढग होऊन गेली...१
आकाश झाकून ते
गार वारा सुटला
मेघांच्या स्पर्शाने
विज बाण कडाडला...२
ढोल ताश्यासव तो
प्रकाशही लखलखे
वरात वा-याची ही
हळूवार पुढे सरके...३
बरसण्या धुवांधार
वर्षा गीत हे रंगले
त्याची तार छेडण्या
नभ दाटून आले...४
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments