स्त्री काल व आजची
आजच्या घडीला घटस्फोटाचे प्रमाण खूप दिसून येते; कारणं परिस्तिथीनुसार वेगवेगळी आहेत; पण आहेत. सुशिक्षित स्त्रीला तीच्या आवडीनिवडी, मानसन्मान, बरे वाईट कळू लागले आहे. अर्थार्जन करू लागल्याने ती सर्वार्थाने सक्षम होत गेली; पण मनामनात बिंबवले गेलेले संस्कार मात्र तिला तारेवरची कसरत करायला लावत होते. आकाशाला गवसणी घालत, सर्व क्षेत्रे पादाक्रांत करत ती उंबरठ्या बाहेर पडलीय खरी पण स्वयंपाकघरातील तिच्या उपजत टाकल्या गेलेल्या जबाबदारीचा वाटेकरी तिचा जोडीदार होताना दिसत नाही. शिक्षण, नोकरी, मुलांचे संगोपन व किचन यात ती पीचत जाऊ लागली. समजाच्या आखीव रेखीव घालून दिलेल्या नियमांविरुद्ध जाण्याचे धाडस संस्कारातमुळे तिच्यात मूळ धरत नव्हते शिवाय मुलांचे आयुष्य उध्वस्त होईल याची विवंचना तिला पाऊल पुढे टाकू देत नव्हती.
गुन्हा कोणीही केलेला असो. खापर मात्र बाईच्याच माथी फोडले जाते. तुम्हाला मुल झालं नाही... बाई वांझ, मुलगा झाला नाही.....,विधवा.... झाली की तिने विद्रूप व्हायचे, अलवनात रहायचे, घरात वाईट झाल की बाई पांढर्या पायाची. असे एक ना दोन अनेक कारणे आहेत.
त्यात भर म्हणजे घटस्फोटित स्त्री म्हणजे बापाचा माल. आजही सरकारी दरबारी कुठेही गेलं तरी मिस्टर काय करतात हा सन्मानाने प्रश्न विचारला जातो परंतु कुठल्या पुरुषाला नाही विचारत कुणी की तुमची विवाहिता काय करते !! मुलींचा गर्भ आजही पोटात मारल्या जातो तोही सुशिक्षित, सधन वर्गाकडूनच. मुलींचे व मुलांचे सरासरी प्रमाणात आजही खूप तफावत आहे. ही चिंतनीय बाब आहे. आज शिक्षण आणि आर्थिक समर्थाच्या जोरावर स्त्रिया विवाहबाबतीत खूप चोखंदळ होत चालल्यात. आर्थिकदृष्टय़ा सुरक्षितता त्या जोडीदाराकडून पसंत करतात. कुठल्याही प्रकारची रोकटोक त्यांना पसंत नसते. वरिष्ठांनी दिलेले सल्ले नकोसे वाटतात. एकतर्फी व रोकठोक व्यवहार त्याना अपेक्षित असतो. आज सासूसासरेही थोडे वचकूनच राहतात अश्या सुनांपुढे पुढे कारण म्हणजे एक घाव दोन तूकडे व्हायला वेळ लागणार नाही. आजच्या कमावत्या स्त्रियांचे जगणे स्वतः भोवती केंद्रीत आहे. एखाद मुलाला जन्म दिला की वैवाहिक आयुष्यातील त्यांची संकल्पना सिद्धीस जाते. बाकी समुहतून मित्रमैत्रिणी सहली, पार्टी, फोटो वै. खूप काही चालत असते.
कल्पना दिलीप म्हापूसकर
मीरारोड
Post a Comment
0 Comments