Type Here to Get Search Results !

सुप्रसिद्ध साहित्यिक कवी सौरभ नवले यांना काव्यमित्र संस्थेचा चा "राष्ट्रीय साहित्यगौरव पुरस्कार २०२५". जाहिर.



दिनांक.१६, पुणे .आपल्या लेखनाने आणि समाज कार्याने अवघ्या महाराष्ट्रात ख्याती मिळवणारे सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक प्रा.सौरभ नवले.आपल्या अनोख्या काव्य शैली मुळे रहस्यकवी या नावाने ओळखले जातात. 


 सौरभ नवले हे कला संस्कृती ज्ञान संगम मंच, मनश्री फाउंडेशन चे संस्थापक असुन त्यांच्याकडे खालील प्रमाणे अनेक संस्थांची विविध पदे आहेत ते डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य चे पुणे जिल्ह्याचे 

जिल्हा प्रवक्ते तर काव्य प्रेमी शिक्षक मंच पुणे जिल्हा चे सचिव आहेत. ते जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथून असून त्यांचे शिक्षण बी .ई मेकॅनिकल,एम. इ.डिझाईन इन मेकॅनिकल आणि एम बी ए (ऑपरेशन) झाले असून सध्या पी एच डी ची प्रवेश परीक्षा दिली आहे आणि पी एच डी या उच्च शिक्षणाची तयारी करत आहे...त्यांनी मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेत कविता ,शेर, गीत लेखन, शायरी,चारोळी,व्याख्यान लेखण,कथालेखन,कादंबरी लेखन,चित्रकला,नाटक लेखन,अभिनय,गायण,सह्याद्री च्या डोंगराची भ्रमांती,विविध कार्यक्रम नियोजन,सुत्रसंचलन,फोटोग्राफि, या आपल्या आवडी जपत त्यांनी सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटविला आहे ते 

सुप्रसिद्ध कादंबरी 

"का गुंतला माझा जीव तुझ्यात?"

चे लेखक असून ते सध्या पुण्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त आहेत आणि यामध्ये त्यांचे आई वडील, भाऊ वाहिनी, त्यांची पत्नी पौर्णिमा आणि जवळचे मित्र रणजित पवार यांचा खारीचा वाटा आहे 

हा पुरस्कार सौरभ नवले यांच्या व्यक्तीमत्त्वालां अजुन उभारी देईल अशी अशा या पुरस्काराचे आयोजक राजेंद्र सगर यांनी व्यक्त केली ..

Post a Comment

0 Comments