Type Here to Get Search Results !

समर्थ पॉलिटेक्निक चा उत्कृष्ट निकाल, प्रांजल घाडगे ९६.८६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम.



प्रतिनिधी जुन्नर | प्रा. सतिश शिंदे

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे या एन बी ए मानांकन प्राप्त तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा निकाल सरासरी ९७ टक्के लागल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ चे निकाल नुकतेच जाहीर झाले.त्यात समर्थ च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.

शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे:


*तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*

प्रथम क्रमांक:

प्रांजल घाडगे -९६.८६ %

द्वितीय क्रमांक:

अर्शद शेख -९६.६३ %

तृतीय क्रमांक:

सृष्टी गाडेकर-९४.०४ %


*तृतीय वर्ष मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग*

प्रथम क्रमांक:

विनायक सावंत-९६.२५%

कैलास भोकरे-९६.२५%

द्वितीय क्रमांक:

ओम औटी -९६%

तृतीय क्रमांक:

पल्लवी वाळुंज-९५.२५ %


*तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग*

प्रथम क्रमांक:

माऊली वाजे-९०.१२%

द्वितीय क्रमांक :

अभिषेक झिंजाड-८५.८८%

तृतीय क्रमांक:

तनुजा इंदोरे-८५ %


*तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनीअरिंग*

प्रथम क्रमांक:

जीवन पवार-८९.५३%

द्वितीय क्रमांक:

स्वप्निल चव्हाण-८६.४२%

तृतीय क्रमांक:

सानिका शेरकर-८५.२१%


*तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग*

प्रथम क्रमांक:

गौरव शिंगोटे-८७.४४ %

द्वितीय क्रमांक:

सार्थक रणपिसे-८३.२२%

तृतीय क्रमांक:

ओंकार खोमणे-८१.७२%


*तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग*

प्रथम क्रमांक:

आदिनाथ शिंदे -८१.५६ %

द्वितीय क्रमांक:

कार्तिक राऊत -७९.६७ %

तृतीय क्रमांक:

रोहन गायकवाड-७८.४४ %


महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाल्याची माहिती उपप्राचार्य प्रा.संजय कंधारे यांनी दिली.

तसेच महाविद्यालयातील १५ हून अधिक विद्यार्थ्यांना गणित,इंजिनिअरिंग ड्रॉइंग,मॅनेजमेंट,पायथॉन प्रोग्रामिंग,इमर्जिंग ट्रेंड इन कॉम्प्युटर अँड आय टी, वेब पेज डिझाईन एप्लीकेशन युजिंग पीएचपी,मोबाईल एप्लीकेशन डेव्हलपमेंट या विषयांमध्ये ७० पैकी ७० गुण मिळाले.

या विद्यार्थ्यांना टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,विभागप्रमुख प्रा.संजय कंधारे,मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे,मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.शाम फुलपगारे,कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा.स्वप्निल नवले,सिव्हिल विभागप्रमुख प्रा.संकेत विघे,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.आशिष झाडोकर यांनी मार्गदर्शन केले.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,विभागप्रमुख व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments