रंगरंगीला श्रावण
सरीवर सरी
श्रावणात पडे
हिरवळ दाटे
मस्त चोहिकडे...१
ओलीचिंब धरा
न्हाऊन निघाली
साज चडविला
लाल लाल लाली...२
इंद्रधनु माळा
गळा घातलेली
श्रावण स्वागता
रंग रंगलेली...३
खळखळत ते
वाहणारे नीर
लगबग घाई
गाठण्यास तीर...४
सण-उत्सवाला
मिळाला रे रंग
नाचगाण्यात रे
नर-नारी दंग...५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments