प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
सावरगाव (ता. जुन्नर)सामाजिक कार्यकर्ते स्व.अकबरभाई यांची पुतणी व मुस्ताक आतार यांची ज्येष्ठ कन्या सिमरन आतार हिने अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या *सीए* परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. सावरगाव पंचक्रोशीत प्रथम महिला सीए झाली असल्याने परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तिचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डिसेंट फाउंडेशन चे जितेंद्र बिडवई ,सेक्रेटरी डॉ. एफ. बी. आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, कादरी वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष रौफ खान, गणेश मेहेर, अजीमभाई तिरंदाज, सलीम पटेल, मुस्ताक भाई आतार, आशपाक आतार, पत्रकार रामकृष्ण भागवत आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments