अण्णा तुझ्या भिमाच बळ मला येऊ दे!
('लिंबू मला मारीला ग लिंबू मला मारीला' या गीताच्या चालीवर आधारित.)
अण्णा तुझ्या भिमाच गं
बळ मला येऊ दे
डोंगराची गं मैना
गीत नवं गाऊ दे
तू जळता निखारा
जसा नभातला तारा
जन जागा केला सारा
गाणं गातो या फकिरा
गाणं गातो या फकिरा...
तुझ्या रूपा मंदी आम्हा पुढारी मिळाला
अण्णा रत्नाची खाणं
अण्णा साहित्याचा मान
अण्णा लेखणीची पानं
त्याला शोषितांची जाणं
त्याला शोषितांची जाणं...
तुझ्या लेखणीला भीती समतेचे वैरी
कृष्णाकाठच्या त्या कथा
दिन दुबळ्यांच्या व्यथा
त्यांनी मांडियल्या यथा
धन्य झाली वैजयंता
धन्य झाली वैजयंता...
ह्यो रान बोका झाला आता वारणेचा वाघ
सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!🙏🌷
Post a Comment
0 Comments