पिंपळपान
हिरवे हिरवे
पान पिंपळाचे
प्रतिक असे ते
पवित्र प्रेमाचे.....१
जाळीदार कधी
पान वहितले
चित्र त्यावरील
आ ठ व णी त ले.....२
पिंपळपान हे
औषधी गुणांचे
जीवन रहस्य
हे दिर्घायुष्याचे.....३
स ळ स ळ णा रे
वा-यासवे पान
निसर्गातील हे
गीत वाटे छान.....४
किलबिल पक्षी
पानांचे सोबती
निसर्ग सौंदर्य
त्यानेच खुलती.....५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments