गैरसमज.....!
समज विरूध्द
गैरसमज असे
अंधारातील हा
जसा पाय फसे.....१
समज ही फुले
विरूध्द हे काटे
त्यांच्या संगतीत
दुःख अति दाटे.....२
गैरसमज हा
मार्ग वाळवंटी
चालताना सुध्दा
साथ सोडे काठी.....३
संसार गाडीचे
कमजोर चाक
कुरकुर करी
तुटलेले नाक.....४
गैरसमज हा
नसता मनात
नंदनवन हे
येई जीवनात.....५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments