कवी शब्दांचा जादूगर....
शब्दांच्या दुनियेत
कवी शब्द जादुगर
शब्दांना मोल देतो
असे किमयागार...१
शब्दफुले उचलून
करी सुंदर तो हार
निरूत्साही मना
उत्साह देतो फार...२
देतो कौसल्याने
शब्दमोती आकार
अडगलीतले तेच
शब्द पडलेले चार...३
साहित्य वनातील
माली किमयागार
फुलवी तो बाग
देतो शब्द बहार...४
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments